*कोंकण एक्सप्रेस*
*”अश्वमेध’ महोत्सवांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
“अश्वमेध’ महोत्सवांतर्गत वेताळ प्रतिष्ठानतर्फे दोन गटांमध्ये निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. खुल्या गटासाठी “राजकारणात मूल्यांची कमतरता – जबाबदार कोण?’ तर इयत्ता शालेय (दहावीपर्यंत) गटासाठी “मी मोठा झालो की देशासाठी काय करेन?’ आदी विषय ठेवण्यात आले आहेत.
खुल्या गटासाठी 1000 शब्द मर्यादा तर शालेय गटासाठी 500 शब्द मर्यादा ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांची आपले निबंध 25 डिसेंबरपर्यंत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस द्वारा- डॉ.सचिन वासुदेव तुळसकर, मु.पो.तुळस-खरीवाडी, वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग-416516 या पत्त्यावर पाठवावेत. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे 1100, 777, 555 चषक व प्रमाणपत्र तर शालेय गटातील विजेत्यांना अनुक्रमे 777, 555, 333 चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

