दोडामार्ग तालुका महिला समन्वयकपदी सौ. सुनंदा धर्णे नियुक्त..

दोडामार्ग तालुका महिला समन्वयकपदी सौ. सुनंदा धर्णे नियुक्त..

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग तालुका महिला समन्वयकपदी सौ. सुनंदा धर्णे नियुक्त..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीला नवे नेतृत्व मिळाले असून, सौ. सुनंदा धर्णे यांची दोडामार्ग तालुका महिला समन्वयकपदी निवड झाली आहे. ही नियुक्ती शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. श्रेया परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

धर्णे या दोडामार्ग पंचायत समितीच्या माजी उपसभापती असून, महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

धर्णे यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील महिला शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात महिला संघटना अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!