दोडामार्ग महिला तालुका संघटकपदी सौ. जेनिफर मार्शल लोबो यांची निवड..

दोडामार्ग महिला तालुका संघटकपदी सौ. जेनिफर मार्शल लोबो यांची निवड..

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग महिला तालुका संघटकपदी सौ. जेनिफर मार्शल लोबो यांची निवड..*

*दोडामार्ग : शुभम गवस..*

हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल पुढे नेत, पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यातील महिला संघटन मजबुतीसाठी सौ. जेनिफर मार्शल लोबो यांची दोडामार्ग महिला तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे आदेश, शिवसेना नेते व सचिव मान. विनायकजी राऊत तसेच संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.
पक्षाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीमुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सौ. जेनिफर लोबो या समाजकार्यात सक्रिय असून, महिलांच्या प्रश्नांबाबत सजग भूमिका घेण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या निवडीमुळे दोडामार्ग तालुक्यातील महिला संघटना अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक भगव्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!