*कोंकण एक्स्प्रेस*
*श्री देवी सातेरी – भद्रकाली पंचायतन देवस्थान आरोंदा वार्षिक जत्रौत्सव 24 नोव्हेंबर रोजी*
*तिरोडा वार्ताहर*
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) : आरोंदा गांवची ग्रामदेवता श्री देवी सातेरी भद्रकाली पंचायतन देवस्थान आरोंदा वार्षिक जत्रौत्सव मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके 1947 सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त सकाळी श्रीं वर महाअभिषेक, केळी ठेवणे व मानवणे , ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे, रात्रौ 11.00 वाजता दीप उजळणे व फटक्याची आतषबाजी, रात्रौ 12.00 वाजता ढोल ताश्याच्या गजरात श्रीं ची पालखी मिरवणूक, रात्रौ 01.00 वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड ( वेंगुर्ला – सिंधुदुर्ग ) यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग. तरी सदर कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देवी सातेरी – भद्रकाली पंचायतन देवस्थान आरोंदा व ग्रामस्थ आरोंदा यांनी केले.

