घाबरू नका : जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी दिगशीवासियांना घातली साद

घाबरू नका : जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी दिगशीवासियांना घातली साद

*कोकण Express*

*घाबरू नका : जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी दिगशीवासियांना घातली साद*

*कोरोना टेस्ट सुविधा उद्यापासून होणार गावातच : सर्वांनी आरोग्य तपासणी करून घ्या. सौ. सावंत यांनी केले आवाहन*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

दिगशी गावात कोरोनाच्या वाढत्या लोक रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी गावात जात नागरिकांना धीर दिला. कोणीही घाबरून जाऊ नका. जिल्हा परिषदची संपूर्ण आरोग्य यंत्रणा तुमच्यासोबत आहे. आरोग्य तपासणीसाठी व स्वँब टेस्टिंगसाठी पुढे या. अशी साद सौ. संजना सावंत यांनी दिगशीवासियांना घातली आहे. गुरुवार दि. 15 पासून गावात आरोग्य कॅम्प लावण्यात यावा. आरोग्य तपासणीसह कोरोना टेस्टची सुविधा गावात उपलब्ध करा अशा सूचना सौ. सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांना दिल्या आहेत.
दिगशी गावात कोरोनाचे थैमान सुरू आहे. या महसुली गावात 300 लोकसंख्या आहे. पैकी आतापर्यंत 60 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. स्वँब टेस्टसाठी नागरिक प्रशासनाला सहकार्य करत नसल्याचे बोलले जात होते. नागरिकांची समजूत काढण्यासाठी सौ. संजना सावंत बुधवारी थेट दिगशीत पोहोचल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, आरोग्य सहाय्यक आनंद चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती बाळा हरयाण, सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्य प्रशासनाला सहकार्य करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन सौ. सावंत यांनी केले आहे. कोरोनात योध्या सारख्या लढणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची सौ. सावंत यांनी विचारपूस केली. तुमच्या पाठीशी लोकप्रतिनिधी सदैव असल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!