महाविस्तारच्या डिजीटल संजीवनीने शेतकरी होणार हायटेक : डॉ.बापूसाहेब लांबाडे

महाविस्तारच्या डिजीटल संजीवनीने शेतकरी होणार हायटेक : डॉ.बापूसाहेब लांबाडे

*कोंकण एक्सप्रेस*

*महाविस्तारच्या डिजीटल संजीवनीने शेतकरी होणार हायटेक : डॉ.बापूसाहेब लांबाडे*

*कृषी विभागाने कर्ले महाविद्यालयात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन*

*शिरगांव : संतोष साळसकर*

पारंपारिक शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे ग्रामिण भागातील शेतकरी हायटेक होणार असून कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार AI ॲप डिजीटल संजीवनी ठरणार असून यातून कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. असे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी डॉ.बापूसाहेब लांबाडे यांनी शिरगांव येथे केले
पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाच्यावतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कृषी विभागाच्यावतीने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार ॲॅपबाबत १८ नोव्हेबर रोजी मार्गदर्शन करताना डॉ.लांबाडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणे हे कृषी विभागाचे मुख्य उद्दिष्ट असून महाविस्तार ॲप शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेत डिझाइन केलेले आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीसुद्धा सहज वापरू शकतात. शेतीतील उत्पादकता वाढविणे, खर्च कमी करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य निर्णय घेणे आता अधिक सुलभ झाले आहे. AI-आधारित चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळणार असून पिकांवरील रोगनिदान व कीडनिदान तसेच फोटोतून ओळख आणि उपाय, हवामान अंदाज, पिक-व्यवस्थापनाची माहिती, शेतजमिनीची आरोग्य पत्रिका, खत मापक, विविध सरकारी योजना, त्यातील लाभ, अर्ज प्रक्रिया आणि तांत्रिक सल्ला शेतकऱ्यांना आता आपल्या मोबाईच्या एका क्लीकवर मिळणे शक्य होणार आहे. ॲपचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी संबंधित समस्या समजून घेऊन, AI-कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने झटपट आणि अचूक मार्गदर्शन व सेवा उपलब्ध होणार आहे अचूक माहितीवर आधारित पूरक निर्णय आणि शिफारसीमुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पिकांचे होणारे नुकसान टाळून वेळेवर रोग व कीडनिदानामुळे उत्पादन खर्चात कपात होईल चुकीच्या व अनावश्यक खते, कीटकनाशके यांचा वापर टाळता येणार आहे. या डिजिटल क्रांतीमुळे महाविस्तार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.अशी माहिती दिली.
यावेळी संस्थेचेउपाध्यक्ष संभाजी साटम, मंगेश लोके, प्राचार्य समीर तारी,ॲकॅडमिक कोआरडीनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम, ग्रामिण विकास विभागप्रमुख प्राध्यापिका सोनाली ताम्हणकर, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कृषी विभागाचे कणकवली सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनायक पाटील, देवगड तालुक्याचे तंत्रज्ञान व्यवस्थापक निकेतन राणे, कुवळे सहाय्यक कृषी अधिकारी अमोल इढोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!