*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुल्र्या ठाकरे शिवसेनेची घरोघरी प्रचारात आघाडी*
*मतदार नागरीकांतूनही प्रचारात सहभाग*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी संदेश निकम व 17 नगरसेवक उमेदवार संपूर्ण शहरात प्रभागवार नियोजन पद्धतीने प्रचार मोहिम राबवित आहेत. या प्रचारात ठाकरे शिवसेनेच्या पदाधिका-यांसह प्रभागातील स्थानिक मतदार नागरीकही मोठ¬ा संख्येने आपले उमेदवार म्हणून सहभागी होत आहेत. या प्रचाराचा धडाका पहाता ठाकरे शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे शिवसेनेतर्फे नगरपरीषद निवडणूकीसाठी प्रचारासाठी केलेल्या नियोजन प्रत्येक प्रभागात निवडणूक रिंगणात असलेल्या दोन उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश निकम हे करीत आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा चेहरा दिसून येत आहे. या प्रचारावेळी माजी उपनराध्यक्ष अस्मिता राऊळ तसेच स्थानिक नगरसेवकपदाचे उमेदवार समिधा रेडकर, अक्षय जाधव यांना स्थानिक नागरीक मोठ¬ा संख्येने आपले उमेदवार समजून घरोघरी आपल्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय गावडे व अजित राऊळ आदी उपस्थित होते.

