शैक्षणिक उठावंतर्गत माजी विद्यार्थी सावंत पिता-पुत्रांची उदार देणगी

शैक्षणिक उठावंतर्गत माजी विद्यार्थी सावंत पिता-पुत्रांची उदार देणगी

*कोंकण एक्सप्रेस*

*शैक्षणिक उठावंतर्गत माजी विद्यार्थी सावंत पिता-पुत्रांची उदार देणगी*

*शाळेच्या तीन वर्ग खोल्या सुशोभित*

*शिरगांव : संतोष साळसकर*

आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपत शाळेचे माजी विद्यार्थी असलेले प्रसाद शिवाजी सावंत व विनय प्रसाद सावंत यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तरंदळे नंबर १ येथील तीन वर्ग खोल्यांना स्वखर्चाने फरशी बसवून देत शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासात मौलाचे योगदान दिले.तसेच शाळेच्या आवारातील मुलांसाठीच्या हॅन्ड वॉश स्टेशनला फरशी बसवली तर शाळेच्या प्रार्थना हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी तस्वीर प्रसाद सावंत व लक्ष्मीकांत सावंत यांच्या सौजन्याने बसविण्यात आली, या उल्लेखनीय कार्याबद्दल शाळेच्या,व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभात पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही दात्यांचा शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे शाळेचा शैक्षणिक व भौतिक दर्जा अधिक उंचावेल. असे माननीय केंद्रप्रमुख श्री शिवाजी पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच तरंदळे शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी सावंत पिता-पुत्रांनी शाळेच्या विकासासाठी पुढील काळातही शक्य ते सर्व सहकार्य देऊ अशी मनापासून ची भूमिका जाहीर करत समाजासाठी, शाळेसाठी जे जे काही करता येईल ते करून आपल्या जवळचा दातृत्व भाव व्यक्त करत, उपस्थितांचे मनोबल वाढवले .
विद्यार्थ्यांचे हितासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे हे तरंदळे गावासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच श्री सुशील कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शाळेच्या शैक्षणिक , भौतिक विकासासाठी सध्या असलेला शिक्षक वृंद मनापासून काम करत असल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे निवेदन रामचंद्र डोईफोडे यांनी निवेदन केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रदर्शन मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर पोकळे यांनी केले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!