*कोंकण एक्सप्रेस*
*दहावीच्या मुलांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांच्या आर्थिक सहकार्यातून तसेच चिकित्सक समुह शिरोळकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलमधील दहावीच्या विद्याथ्र्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक चिकित्सक समुह शिरोळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संचिता गावडे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या युगात चांगले गुण मिळवा आणि पुढील जीवनात त्यांचा चांगला वापर करा असे सचिन वालावलकर यांनी सांगितले. माजी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रामचंद्र आंगणे यांनी आजच्या मार्गदर्शनाचा चांगला वापर करून येणा-या दहावीच्या परीक्षेत विद्याथ्र्यांनी 100 टक्के यश मिळवून आपल्या शाळेचा नावलौकीक वाढवा असे आवाहन केले.
यावेळी ममता सोनवणे, शारदा वायल, मुख्याध्यापक के.डी.खरबडे, आडेली हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव, मुख्याध्यापक खरबडे आदी उपस्थित होते. या मार्गदर्शन वर्गात कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूलचेही विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रशांत सावंत यांनी केले.

