*कोंकण एक्सप्रेस*
*सेंटलुक्स हॉस्पिटल पुन्हा वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी होणार सुसज्ज – पालकमंत्री राणे*
*जिल्ह्रातील पहिले पंतारांकित हॉटेलही शिरोडा मध्ये*
*वेंगुर्ला प्रतिनिधी -प्रथमेश गुरव*
वेंगुर्लेकरांसाठी गोड बातमी मी आज घेऊन आलेलो आहे. शिरोडा येथील ताज हॉटेलसाठी लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ताज हॉटेल उभे राहून येथील तरूण तरूणींना रोजगार मिळणार आहे. तर सेंटलुक्स हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरच सुसज्ज असे हॉस्पिटल वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी आज वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
भाजपाचे उमेदवार आणि मतदारांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री वेंगुर्ला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्रातील चारही नगरपरिषदेंच्या निवडणुका भाजप पक्ष फक्त विकासाच्या अजेंड¬ावर लढवित असल्याची भूमिका भाजपच्या सर्व नेत्यांनी मांडलेली आहे. कोणत्याही पद्धतीचे गलिच्छ राजकारण, आपापसातील टिका टिपण्णीमध्ये आम्हाला रस नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही वेंगुल्र्याच्या जनतेसाठी काय करू शकतो? कुठला विकास करू शकतो हा आमचा हेतू आहे.
शिरोड¬ातील पंचतारांकित ताज हॉटेलबाबत गेले काही वर्षे चर्चा होती. यासाठी अनेक पाठपुरावा झाला. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ताज हॉटेलसाठी लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असल्याने सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा मार्ग मोकळा झाला आहे. या हॉटेलसोबतच तेथील प्रलंबित प्रश्नांनासाठी जनतेला वि·ाासात घेतले जाणार आहे. ताज प्रकल्पाशी निगडीत उपलब्ध होणा-या नोक-या प्राधान्याने वेंगुर्लावासीयांना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. ताज हॉटेल पर्यटनाची गती अधिक वाढवेल. जिल्ह्रात आर्थिक समृद्धी येण्यासाठी हे हॉटेल अतिशय महत्त्वाचे ठरेल असा वि·ाास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
वेंगुर्ला शहरातील सेंटलुक्स हॉस्पिटल हा नेहमीच चर्चेचा विषय राहीला आहे. भाजपाच्या पदाधिका-यांनी हा विषय हातात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी एका टप्प्यावर हा विषय आणून ठेवला आहे. गेल्या तीन दिवसांत केलेल्या पाठपुराव्यानंतर त्याची फायनल ऑर्डर आणण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यापुढे सेंटलुक्सच्या व्यवस्थापनाशी आम्ही बोलू आणि लवकरच वेंगुल्र्यात सुसज्ज असे हॉस्पिटल वेंगुर्लेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. चांगले डॉक्टर, चांगली मेडिकल सुविधा या सगळ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. याचबरोबर उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या अपु-या सुविधांवर सुद्धा आम्ही काम करून त्याठिकाणी चांगले डॉक्टर, चांगल्या सुविधा देणार आहोत. आरोग्याच्या विषयामध्ये वेंगुर्लेकरांना कोणावरही अवलंबून न रहाता आदर्श आरोग्य सुविधा उपलब्ध देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही ठोस पावले उचलली आहेत.
पाणबुडी प्रकल्प सर्व परवानग्यांच्या प्रक्रियेत आहे. या प्रकल्पाबाबत ज्या पद्धतीने आमदार दीपक केसरकर यांनी उल्लेख केला तसा लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल. आम्ही सर्वजण सरकारमध्ये याचा पाठपुरावा करीत आहोत. झी सिनेमेसारखे अॅवॉर्ड वेंगुल्र्यामध्ये पुढीलकाळात होणार आहे. यामुळे कोकणासहीत वेंगुल्र्याची सुद्धा चर्चा होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्राचे अर्थकारण बदलून जाणार आहे. म्हणून या निवडणुका आम्ही “आरेला कारे’ करण्यासाठी किंवा राजकारण म्हणून नाही तर सत्तेच्या माध्यमातून काय करू शकतो, काय परिवर्तन आणू शकतो या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

