*कोंकण एक्सप्रेस*
*प्रमिला घारे यांचे वृद्धापकाळाने निधन*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
तुळस – चुडजीवाडी येथील रहिवासी प्रमिला विठ्ठल घारे (91) यांचे 19 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन विवाहीत मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तुळसचे माजी सरपंच भाग्यलक्ष्मी घारे यांच्या त्या सासू तर प्रमिला काथ्या उद्योगाचे मालक प्रसाद घारे यांच्या त्या आई होत.
फोटो – प्रमिला घारे.

