भारतीय जनता पार्टी फोंडाघाट विभागाची ग्रामीण मंडळ बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी फोंडाघाट विभागाची ग्रामीण मंडळ बैठक संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*भारतीय जनता पार्टी फोंडाघाट विभागाची ग्रामीण मंडळ बैठक संपन्न*

*फोंडाघाट ः संजना हळदिवे*

भारतीय जनता पार्टी कणकवली ग्रामीण मंडळाच्या फोंडाघाट विभागाची बैठक आज पूर्णानंद भवन, फोंडाघाट येथे पार पडली. *आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच कणकवली नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर* ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस प्रदेश सरचिटणीस श्री. राजन चिके, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर,जिल्हा चिटणीस संतोष कानडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बबन हळदिवे, ज्येष्ठ उद्योजक दत्तकुमार सामंत, सुजाता हळदिवे तसेच विभागातील मंडळ पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, आजी-माजी सरपंच–उपसरपंच, विविध मोर्चा/सेल पदाधिकारी यांसह सुमारे 75 कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणूक नियोजन, मतदारयादी तपासणी, बूथनिहाय समीक्षा आणि कणकवली नगर पंचायत निवडणुकीसाठी संघटनात्मक समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली.
तसेच फोंडाघाट विभागातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित विभागांकडे नियमित पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.

बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संघटनातील एकजूट, शिस्त आणि बूथस्तरावरील सक्रियता यावर विशेष भर देत,
“पक्ष आदेश सर्वोच्च आहे; प्रत्येक कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद आहे” या संदेशाने बैठक संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!