दोडामार्ग–आयी मार्गावरील बीएसएनएल फायबर केबल कामावर रविकिरण गवस यांच्या तक्रारीनंतर कारवाई; जेसीबी जप्त, काम तात्काळ बंद

दोडामार्ग–आयी मार्गावरील बीएसएनएल फायबर केबल कामावर रविकिरण गवस यांच्या तक्रारीनंतर कारवाई; जेसीबी जप्त, काम तात्काळ बंद

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्ग–आयी मार्गावरील बीएसएनएल फायबर केबल कामावर रविकिरण गवस यांच्या तक्रारीनंतर कारवाई; जेसीबी जप्त, काम तात्काळ बंद*

*दोडामार्ग : शुभम गवस*

राज्य मार्ग क्रमांक १८६ (बांदा–दोडामार्ग–माटणे–आयी) या महत्त्वाच्या मार्गावर बीएसएनएलचे ऑप्टीकल फायबर केबल काम नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याची बाब अखेर उघड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) गुरुवारी दुपारी कारवाई करत हे काम तात्काळ थांबवले.
गवस यांनी संबंधित काम अटी-शर्तींच्या विरोधात आणि लेखी परवानगीशिवाय सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता अनियमितता स्पष्टपणे दिसून आली. नियमभंग केल्याने बीएसएनएलकडील सुरू असलेले काम तत्काळ थांबवण्यात आले.
या कारवाईदरम्यान कामासाठी वापरलेले जेसीबी (क्र. GA-07-P-2189) ताब्यात घेण्यात आले असून, ते अधिकृतरित्या PWD उपविभागीय कार्यालयात जमा केले आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.
रविकिरण गवस यांच्या पुढाकारामुळे ही कारवाई घडून आली असून त्यांच्या कार्यकर्तबगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. चुकीच्या पद्धतीने काम करून जनतेला त्रास देणाऱ्यांविरोधात पुढेही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे विभागातील प्रशासन सजग झाले असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची चर्चा स्थानिक वर्तुळात सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!