*कोंकण एक्सप्रेस*
*प्रभाग क्र. 15 नाथ पै नगर येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ*
*सतीश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ*
*कणकवली ः संजना हळदिवे*
नगरपंचायत प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक शहर विकास आघाडीच्या पॅनल मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कणकवलीच्या विकासासाठी संदेश पारकर यांना घेऊन मास्टर प्लॅन बनवून कणकवली विकासमय करणार तसेच भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करणार . यासाठी प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक त्यांना भक्कम साथ देत आहेत त्यांच्या उमेदवारीबद्दल जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत असून प्रभाग क्रमांक 15 मध्ये संकेत नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, प्रभाग क्र.15चे नगरसेवक पदाचे उमेदवार संकेत नाईक, सतीश सावंत, सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, राजू शेट्ये, सुशील आळवे,
योगेश मुंज, अजित काणेकर, मंगेश राणे, रिमेश चव्हाण, चेतन वालावलकर, चेतन मुंज, अमित राणे, संदेश मयेकर, राजन महाडगूत, समीर पावसकर, बंड्या राणे, महेंद्र नाईक, संदेश जाधव, बाळा कुडतरकर, समीर सावंत,बाबू जाधव, गुरु मोर्ये, कमलेश नारकर, संकेत कुडतरकर आदी उपस्थित होते.

