७२ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा कार्यक्रम श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था, लि., मठ संस्थेच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न*

७२ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा कार्यक्रम श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था, लि., मठ संस्थेच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*७२ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा कार्यक्रम श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था, लि., मठ संस्थेच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न*

*सिधुदुर्गनगरी*

७२ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा कार्यक्रम श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था, लि., मठ संस्थेच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाला जिल्हयात सहकार वाढीसाठी संस्थेतील पदाधीकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी ‘ केले
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बैंक लि. व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्ग यांचे वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १४ नोव्हेंबर ते अखेर सहकारी सप्ताह साजरा होत आहे. भारत देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या दि. १४ नोव्हेंबर पासुन सुरु होणाऱ्या सहकारी सप्ताहाचा कार्यक्रम वेंगुर्ला तालुक्यातील श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था. लि. मठ मध्ये
१९ नव्हेबर रोजी सहकार सप्ताह निमित्त सहकार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या सहकार मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी, उदघाटक सहकार अधिकारी श्रेणी- १ सहकार खाते वेंगुर्ला श्री. आर.टी. चौगुले यांनी केले. जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष श्री. गजानन सावंत, संचालक श्री. एम. के. गावडे वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर केळजी, भोगवे गावचे माजी सरपंच श्री. महेश सामंत, जिल्हा सहाकर बोर्डाचे मा. संचालक श्री. रमण वायंगणकर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उदघाटन भाषणामध्ये श्री. आर.टी. चौगुले सहकार अधिकारी श्रेणी1 यांनी तरुण वर्गाने सहकारी संस्थांमध्ये समाविष्ठ होवून बेकारी कमी करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरु केले पाहिजेत ग्रामिण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी पारंपरीक शेती व्यतिरीक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती उत्पादने वाढवावीत, सर्वांनी संघटित होवून सहकाराच्या माध्यमातून आपला व गावाचा सर्वांगिण विकास साधावा, असे मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच माजी सरपंच श्री. महेश सांमत यांनी कोकणातील निसर्गाचा पुरेपुर वापर करुन कृषी पर्यटनावर सहकाराच्या माध्यमावर चालना देण्यात यावी, असे सुचित केले तर श्री. एम. के. गावडे सहकार वाढीसाठी करावयाचे प्रयत्न यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी यावेळी सहकारी चळवळीतील सहकार संस्थेमधील या पवित्र क्षेत्रामध्ये आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद, संचालक, अधिकारी/कर्मचारी काम करीत आहोत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम करुन आपली संस्था नावारुपाला कशी येईल यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हयातील सर्व प्रकारच्या संस्थांना जिल्हा बँकेचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल मिळालेल्या या संधीचा सदुपयोग केला पाहिजे तसेच सहकारी संस्थातील पदाधिकारी कर्मचारी यांनी वेळोवेळी प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे, असे नमूद केले.

सहकार मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहकार बोर्डाचे विकास अधिकारी श्री. मंगेश पांचाळ यांनी केले. कार्यक्रमास श्री. स्वयंमेश्वर वि.का.स सेवा संस्था, लि., मठ चे अध्यक्ष श्री. सुभाष बोवलेकर यांनी संस्था सभागृहात कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले या मेळाव्याला वेंगुर्ला तालुक्यातील सर्व विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी, वेंगुर्ला व सहकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!