*कोंकण एक्सप्रेस*
*निवडणूक तयारीला वेग: शिवसेनेत दोन महत्त्वाच्या नियुक्त्या*
*दोडामार्ग / शुभम गवस*
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. साटेली–भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी संदेश दौलतराव राणे यांची उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार व शिवसेना नेते विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर झाली.
राणे यांच्या तरुण नेतृत्वामुळे संघटनाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे. त्याचबरोबर रिक्त असलेल्या उपतालुका संघटक पदावर ज्येष्ठ शिवसैनिक देवेंद्र (राजू) धर्णे यांची निवड करण्यात आली आहे.
दोन्ही निवडपत्रे तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी नगरसेवक चंदन गावकर, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, सिद्धेश कासार, ऑल्विन लोबो, दशरथ मोरजकर, शुभंकर देसाई, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुका शिवसेनेतर्फे दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

