*कोंकण एक्सप्रेस*
*श्री देव रवळनाथ, देवी माऊली पंचायतन पाडलोस वार्षिक जत्रौत्सव 26 नोव्हेंबरला*
*सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) :- प्रतिनिधि*
पाडलोस गांवचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ, देवी माऊली वार्षिक जत्रौत्सव मार्गशीर्ष शुद्ध षष्टी शके 1947 बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त सकाळी देवतांवर महाआभिषेक, समाराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे व मानवणे, नवस बोलणे व फेडणे रात्रौ 11.00 वाजता दीप उजळणे व फटाक्याची आताषबाजी, रात्रौ 11.30 वाजता ढोल ताश्याच्या गजरात श्रीं ची पालखी मिरवणूक, रात्रौ 01.00 वाजता आजगांवकर दशावतार नाट्यमंडळ आजगांव ( सावंतवाडी -सिंधुदुर्ग ) यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग.तरी सदर कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ, देवी माऊली पंचायतन पाडलोस व ग्रामस्थ पाडलोस यांनी केले.

