शिवसेनेचा कणखर आवाज आ. निलेश राणे आज कणकवलीत

शिवसेनेचा कणखर आवाज आ. निलेश राणे आज कणकवलीत

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेनेचा कणखर आवाज आ. निलेश राणे आज कणकवलीत*

*कार्यकर्त्यांशी संवद साधून ठरणार रणनीती*

*शिवसेना नेते राजन तेले यांची माहिती*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली नगरपंचायत निवडणुकी भाजपच्याविरोधात शहर विकास आघाडी अंतर्गत क्रांतिकारी विचार पक्षात लढत होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा कणखर आवाज आमदार निलेश राणे बुधवारी कणकवलीत दाखल होत आहेत. श्री. राणे हे माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

कणकवली नगरपंचायतीत शहरविकास आघाडी स्थापन झाली असून त्यात शिंदे शिवसेनेचे नेतेही सहभागी आहेत. निलेश राणेंनी काही दिवसांपूर्वी शहर विकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत विचार निर्णय घेतला आहे. त्यामुळे कणकवलीत येऊन आ. निलेश राणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत चुरस वाढली आहे. शहर विकास आघाडीमध्ये भाजपाविरोधी बहुतांशी सर्वच पक्ष एकत्र येत क्रांतिकारी विकास पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहेत. शिंदे शिवसेना या पॅनलमध्ये सहभागी आहे. बुधवारी आज संध्याकाळी निलेश राणे यांचा कणकवली दौरा असून यावेळी ते पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शहरविकास आघाडीत सहभागी असलेल्या विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी आम. राणे चर्चा करणार का? कणकवली नगरपंचायत निवडणुकीत निलेश राणेंचा नेमकी भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!