कुडाळ तहसीलदार पदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला

कुडाळ तहसीलदार पदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळ तहसीलदार पदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला*

*कुडाळ: प्रतिनिधी*

तहसीलदार पदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला आहे. यापूर्वी ते महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते. त्यांची बदली कुडाळ येथे झाली आहे.

यापूर्वी कुडाळ तहसीलदार पदावर वीरसिंग वसावे कार्यरत होते. त्यांची बदली रत्नागिरी येथे झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेवर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार सचिन पाटील यांनी यापूर्वी चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी काम केले आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर अनेक संघटनांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. पदभार स्वीकारल्यावर बोलताना तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल आणि या योजनांचा लाभ जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!