*कोंकण एक्सप्रेस*
*सुधीर आडीवरेकर यांनी केला प्रचाराचा शुभारंभ*
*सावंतवाडी: प्रतिनिधी*
प्रभाग क्रमांक ५ चे उमेदवार सुधीर आडीवरेकर यांनी आज नरसोबा मंदिरात श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले तसेच महिला नगरसेवक पदाचे उमेदवार दुलारी रांगणेकर यांनीही प्रचाराला प्रारंभ केला.
प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी युवराज लखम राजे भोसले यांचीही उपस्थिती होती. प्रचाराच्या शुभारंभामुळे प्रभागात निवडणुकीचे रंगत वाढणार आहे.

