मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी भरला फॉर्म

मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी भरला फॉर्म

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी भरला फॉर्म*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री. दीपक पाटकर, श्री. महेश कोयंडे व अन्य उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सूर्यकांत पाटील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या कडे उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहून सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रगतीसाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध असून या नगरपरिषद निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सज्ज आहेत…!
या प्रसंगी माजी आमदार श्री. राजन तेली, उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजय पडते, जिल्हा सचिव श्री. दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, श्री. उमेश नेरुरकर, श्री. काका कुडाळकर यांच्यासह शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी उत्साहपूर्वक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!