*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गनगरी परिसरातील गाळे व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत सविस्तर केली चर्चा*
*ओरोस*
सिंधुदुर्गनगरी परिसरातील गाळे व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे साहेब यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. व्यापाराला आवश्यक सुविधा,बाजारपेठेतील जागांचे नियोजन आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या अडचणी यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना योग्य तो मार्ग मिळावा,
तसेच बाजारपेठ अधिक सुव्यवस्थित आणि विकसित व्हावी यासाठी सकारात्मक पर्याय काढू असे राणे साहेबांनी आश्वासित केले.

