नगरध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी एकूण ७२ उमेदवारी अर्ज दाखल

नगरध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी एकूण ७२ उमेदवारी अर्ज दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*नगरध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी एकूण ७२ उमेदवारी अर्ज दाखल*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी रविवारी नगराध्यक्ष पदासाठी ५ तर नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी एकूण ७२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून दिलीप लक्ष्मण गिरप, शिदेसेनेकडून नागेश मोहन गावडे आणि बुधाजी उर्फ उमेश बाबूराव येरम, उद्धवसेनेकडून संदेश प्रभाकर निकम तर अपक्ष म्हणून सोमनाथ वसंतराव टोमके यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर नगरसेवकपदांसाठी भारतीय जनता पार्टीकडून ३०, शिदेसेनेकडून २२, उद्धवसेनेकडून ९, काँग्रेसकडून ५ तर अपक्ष म्हणून ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. त्यामुळे सोमवारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी आणखी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!