वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढे आले पाहिजे*

वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढे आले पाहिजे*

*कोंकण एक्सप्रेस*

*वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढे आले पाहिजे*

*शिरगांव : संतोष साळसकर*

संविधान 75 निमित्ताने शेट म ग हायस्कूल देवगड येथे नशाबंदी मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या कि,विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये वाढत जाणारी व्यसनाधीनता सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पालकांचे दुर्लक्ष, शासनाची अनास्था , सभोवताली विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे, मोहात टाकणारे, वाढलेले व्यसनांचे प्रकार पाहता यावर नियंत्रण करणे कठीण झाले आहे. परिणाम अनुकरण म्हणून, कुतुहलापोटी , सहज उपलब्धता या सर्वांमुळे विद्यार्थी व्यसनांकडे आकर्षित होऊन आपले आयुष्य उध्वस्त करून घेत आहेत.
या सगळ्या व्यसनातून दूर राहायचं असेल तर स्वतःला प्रयत्न करायला हवेत. स्वतः निर्धार पूर्वक या व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. त्यानंतर इतरांना व्यसनांपासून लांब ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करायला हवे. यासाठी आपल्या शिक्षकांचे गावाचे गावातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिकांचे ग्राम पंचायतीचे सहकार्य घेऊन हे कार्य पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. यासाठी घटनेने सुद्धा आपल्याला अधिकार दिलेले आहेत संविधानातील संविधानातील कलम 47 चा आधार घेऊन सार्वजनिक ठिकाणी व्यसनांच्या पदार्थांचे सेवन व विक्री करण्यावर बंदीची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली पाहिजे. गावागावातून या व्यसनांच्या पदार्थांच्या विरोधात प्रचार मोहिमा सुरू केल्या पाहिजेत. तर आणि तरच वाढत्या व्यसनाधीनतेला आळा बसेल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी पुढे यावे असे मत अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्घाटन कलम 47 चे वाचन करून मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांनी केले. यावेळी सहाय्यक शिक्षक प्रसाद शेगडे, सागर कर्णिक, पर्यवेक्षिका श्रीमती निशा दहिबावकर आदी मान्यवर उपस्तित होते. शेवटी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!