दोडामार्गमध्ये ‘ड्रग्स सेवन’ लघुपटाद्वारे नशामुक्तीची जनजागृती

दोडामार्गमध्ये ‘ड्रग्स सेवन’ लघुपटाद्वारे नशामुक्तीची जनजागृती

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गमध्ये ‘ड्रग्स सेवन’ लघुपटाद्वारे नशामुक्तीची जनजागृती*

*स्वामी माऊली प्रोडक्शनचा उपक्रम शाळांमध्ये जोरदार प्रतिसाद..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

सध्या वाढत्या अमली पदार्थांच्या व्यसनामुळे नवयुवकांचे जीवन धोक्यात येत असल्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन दोडामार्गमधील स्वामी माऊली प्रोडक्शन, सिंधुदुर्ग यांनी “ड्रग्स सेवन” हा जनजागृतीपर लघुचित्रपट तयार केला आहे. या लघुपटाच्या माध्यमातून तरुण वर्गाला नशेमुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला असून, शाळांमध्ये हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक केले जात आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन करण शेटकर यांनी केले असून, उपक्रमाचे प्रो. अध्यक्ष विकास तर्पे आहेत. जनजागृती मोहीम राबविण्यासाठी बिरोबा कोळापटे, अमृता भोसले आणि राजेश नाईक या टीम सदस्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.
या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत चार शाळांमध्ये लघुपटाचे प्रदर्शन व मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामध्ये —
न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी
कुडासे हायस्कूल
कळणे हायस्कूल
ज्युनियर कॉलेज, दोडामार्ग
या सत्रांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण झाली आहे.
स्वामी माऊली प्रोडक्शनची ही टीम संपूर्ण महाराष्ट्रभर नशामुक्तीचा संदेश पोहचवण्याचा ध्यास घेत असून, “नवीन पिढी सक्षम, आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त व्हावी,” हा हेतू त्यांनी व्यक्त केला.
नशा विरोधातील संघर्षात समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे आवश्यक असून, या लघुपटासारखे उपक्रम समाजाला दिशा देणारे असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!