*कोंकण एक्सप्रेस*
*भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक सूचनानुसार*
1. 50000 पर्यंत कोणीही कॅश बाळगू शकतो
2. 50000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर त्याने योग्य कागदपत्रासह स्पष्टीकरण दिल्यास ती परत करावी लागते
3. 50000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर त्याने योग्य कागदपत्रासह स्पष्टीकरण दिले नाही तर 10 लाखपर्यंत रक्कम मा. जिल्हा दंडाधिकारी यांच्या ताब्यात राहील
4. 10 लाखाच्या वर रक्कम असेल तर इन्कमटॅक्स विभागाकडे रक्कम राहील
5. 50000 पेक्षा अधिक कॅश उमेदवार, त्याचा प्रतिनिधी, किंवा कोणताही पक्ष कार्यकर्ता किंवा पोस्टर, निवडणूक साहित्य, drugs, दारू, शस्त्र, किंवा भेटवस्तू ज्यांची किंमत 10000 पेक्षा अधिक आहे जे मतदाराना प्रभावित करेल किंवा इतर बेकायदेशीर वस्तू इत्यादी वाहून नेणारे वाहन सापडल्यास जप्त करावे.
6. अशा प्रकारे तपासणी व जप्ती करताना संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण करावे व ते निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावे.

