*कोंकण एक्सप्रेस*
*रत्नागिरीत शिवसेनेचे 9 उमेदवार जाहीर*
*जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी संपर्क प्रमुख यशवंत जाधव व आमदार किरण सामंत यांच्या उपस्थिती मध्ये केले जाहीर*
*वादगस्त वार्ड मधील नाव तशीच ठेवली*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
पालकमंत्री उदय सामंत उद्या 17 उमेदवाराची नाव जाहिर करणार..महिला उमेदवाराची यादी पूर्णतः जाहीर नाही.. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्याप ही गुलदस्त्यात…
महायुतीमधील शिवसेना पक्षाचे प्रभागनिहाय उमेदवार पहिली यादी जाहिर
प्रभाग क्र.३
उमेदवाराचे नाव
प्रभाग क्र. २–जागा ब – (सर्वसाधारण)
श्री. निमेश विजय नायर
प्रभाग क्र.३–जागा ब – सर्वसाधारण
श्री. राजन रामकृष्ण शेट्ये
प्रभाग क्र. ५
जागा अ – नामाप्र सर्वसाधारण
श्री. सौरभ सुरेश मलुष्टे
प्रभाग क्र. ७
जागा अ – नामाप्र
श्री. गणेश कमलाकर भारती
जागा ब- सर्वसाधारण स्त्री
सौ. श्रद्धा संजय हळदणकर
प्रभाग क्र. ८
जागा ब- सर्वसाधारण
श्री. दत्तात्रय विजय साळवी
प्रभाग क्र. ९
जागा अ- अनु. जाती सर्वसाधारण
श्री. विजय गोविंद खेडेकर
संपूर्ण क्र. १३
जागा अ – सर्वसाधारण स्त्री
आफ्रीन उबेद होडेकर
जागा ब- सर्वसाधारण
सुहेल महम्मद साखरकर
तरी शिवसेना पक्षाच्या आदेशाने वरील उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत.
सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार म्हणून जे नऊ जाहीर झालेले आहेत त्याच्या सर्वप्रथम एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी हे आता या सगळ्या जाहीर करण्यासाठी आम्हाला परवानगी आणि आदेश दिलेले होते.
उद्या सकाळी दहा वाजता महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे नऊ सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेले सहा सदस्य आणि या सर्व उमेदवारांचे अर्ज नगरपालिकेत आम्ही देणार आहोत त्यासाठी सर्व आमची नेते मंडळी उपस्थित असतीलच पण स्वतः पालकमंत्री सामंत साहेब सुद्धा उद्या उपस्थित राहणार आहेत.
आणि जल्लोषात आणि हा उमेदवारांचा आहे आणि पालिकेत सादर करणार आहोत आम्हाला ठाम विश्वास आहे की रत्नागिरी जेवढ्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्यांची बोलणी जवळ जवळ फायनल झालेली आहे आणि रत्नागिरी नगरपालिकेत परत एकदा महायुतीचा भगवा फडकेल त्यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही.
सर्वांनी जो सामंत साहेबांवर जो विश्वास ठेवलेला आहे तिथल्या सर्व जनतेने जो विश्वास ठेवलाय तो निश्चितच आम्हाला हे जे सदस्य आहेत नगरपालिकेचे नगरसेवक असणारे त्यांच्यावर सुद्धा जनता ठामपणे विश्वास ठेवेल असा आम्हाला विश्वास वाटतो असे ही जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी सांगितले.

