*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उद्या भरणार नगराध्यक्ष पदाचा फॉर्म*
*समीर नलावडे विरुद्ध कोण उतरणार निवडणूकीच्या रिंगणात ?*
*कणकवली ः संजना हळदिवे*
सिंधुदुर्गात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून समीर नलावडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देश पत्र दाखल करणार आहेत. कणकवलीत नामनिर्देश पत्र दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत भाजपचे उमेदवार म्हणून समीर नलावडे अर्ज दाखल करत असताना यावेळी अन्य काही उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. एकीकडे भाजपचे उमेदवार म्हणून जमीन नलावडे अर्ज दाखल करणार तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून अद्याप अधिकृत उमेदवार म्हणून नाव जाहीर झाले नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत समीर नलावडे विरुद्ध कोण असणार रिंगणात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

