*कोंकण एक्सप्रेस*
*तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत संकल्प चिंदरकरचे सुयश*
*कणकवली : प्रतिनिधि*
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी संकल्प नरेंद्र चिंदरकर याने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत सुयश संपादन केले. १३ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. आपत्ती पासून निर्माण होणारे धोके व संरक्षण करण्यासाठी पंचायत समिती कणकवली, शिक्षण विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून संकल्प चिंदरकर याने द्वितीय क्रमांक मिळवत सुयश संपादन केले. या त्याच्या सुयशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीशजी सावंत, शालेय समिती चेअरमन श्री. आर.एच.सावंत तसेच सर्व संस्था, शालेय समिती पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

