*कोंकण एक्सप्रेस*
*अंमली पदार्थाचे जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागानी एकत्रीत काम करावे -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*
*सिंधुदुर्गनगरी*
अंमली पदार्थाचे जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस विभाग आणि सर्व विभागानी एकत्रीत काम करावे अशा तक्रारी आढळल्यास कारवाई करावी अमली पदार्थाचे समुळ उच्चाटनासाठी होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सुचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या
सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे. श्रीम. तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली N-CORD संदर्भात मासिक बैठक आयोजीत करण्यात आलेली होती. सदर बैठकीस नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच श्री. मच्छिद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंमली पदार्थ संबधीत विभागाचे सर्व प्रतिनिधी स्वतः तसेच ऑनलाईन व्ही. सी. द्वारे उपस्थित होते.
नमुद बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करणेबाबत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सुचना दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन याबाबत गोपनिय माहीतगारांमार्फत माहिती काढून असे करत असलेल्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कारवाई करणेसाठी प्रयत्न करणेबाबत सुचना दिल्या.
तसेच अशाप्रकारचे बेकादेशीर कृत्य करणाऱ्यांवर प्रतिबंध करणेसाठी, शाळा / कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थांचे परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री होत असल्यास त्यादृष्टीने कारवाई करणेसाठी संबधीत विभागांना आदेशीत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यास लागुन मुख्यत्त्वे लगतचे गोवा राज्य असुन त्या राज्यातुन शिरोडा, वेळाघर याठिकाणी परदेशी नागरीक मोटार सायकल किंवा बोटीद्वारे प्रवास करीत असतात त्यांचेकडुन अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री व सेवन होत आहे, त्यामुळे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळुन जनजागृती अभियान हाती घेवुन अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणेबाबत सुचना दिल्या.

