गरजलो रे गराजलो एक चळवळ चे सर्वेसर्वा सहदेव धर्णे यांना ‘ कोकणरत्न ‘ पदवीसाठी निवड

गरजलो रे गराजलो एक चळवळ चे सर्वेसर्वा सहदेव धर्णे यांना ‘ कोकणरत्न ‘ पदवीसाठी निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*गरजलो रे गराजलो एक चळवळ चे सर्वेसर्वा सहदेव धर्णे यांना ‘ कोकणरत्न ‘ पदवीसाठी निवड*

*मुंबई पत्रकार भवन, आझाद मैदान येथे 13 डिसेंबर रोजी सायं. 4 ते 6 या वेळेत होणार पदवी प्रदान सोहळा*

*शिरगांव | संतोष साळसकर*

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था(रजि.) आणि गराजलो रे गराजलो एक चळवळ चे सर्वेसर्वा श्री सहदेव धर्णे यांची स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे “कोकणरत्न ” पदवीसाठी सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे.
हा कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत स्थळ – मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर यांची उपस्थितीत विशेष लाभणार आहे.
तरी या सोहळायला सर्वांनी उपस्तित राहावे असे आवाहन मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर
खजिनदार राजेंद्र सुर्वे नेते सुभाष राणे, मुख्य सल्लागार दिलीप लाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!