*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट व ज्युनिअर कॉलेजचे सुयश*
*फोंडाघाट: प्रतिनिधी*
क्रीडा व युवक सेवा संचलणाय, महाराष्ट्र राज्य,पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय कुराश स्पर्धा आज दिनांक 12/11/2025 रोजी क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे…
I)14 वर्ष वयोगट मुली:-
कु.कृष्णाई नंदकिशोर रावराणे.
(48 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
II)17 वर्ष वयोगट मुली:-
कु.ऋतुजा रुपेश चव्हाण
(48 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
III)17 वर्ष वयोगट मुले:-
1)जय प्रसाद देसाई
(40किलो वजनी गट-द्वितीय क्रमांक)
2)दुर्वांक दीपेश नातू
(45 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
3)सिद्धेश सुनिल सांडिम
(50 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
4)आकाश अपन्ना गोंधळी
( 66 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
IV)19 वर्ष वयोगट मुले:-
तेजस संतोष पारकर
(50 किलो वजनी गट-प्रथम क्रमांक)
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.वरील सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक श्री.ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाटचे चेअरमन श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार श्री.वि.रा.तायशेटे, शाळा समिती चेअरमन श्री.द.दि.पवार,संचालक मंडळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद कृ.पारकर, पर्यवेक्षक श्री.वि.पां.राठोड, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

