पक्ष शिस्त भंग प्रकरणी संदेश वरक यांची उबाठा सेनेतून हकालपट्टी

पक्ष शिस्त भंग प्रकरणी संदेश वरक यांची उबाठा सेनेतून हकालपट्टी

*कोंकण एक्सप्रेस*

*पक्ष शिस्त भंग प्रकरणी संदेश वरक यांची उबाठा सेनेतून हकालपट्टी*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुका उपसंघटक संदेश वरक यांची पक्षशिस्तीचा सातत्याने भंग केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व संघटनात्मक कामकाजावर त्यांनी सतत टीका करत पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्याबाबत वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात कोणताही सकारात्मक बदल झाला नाही. परिणामी आज झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!