बागायतदारांना पॅक हाऊस उभारणीसाठी जिल्हा बँकेकडून अर्थसहाय्य देणार-जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी

बागायतदारांना पॅक हाऊस उभारणीसाठी जिल्हा बँकेकडून अर्थसहाय्य देणार-जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी

*कोंकण एक्सप्रेस*

*बागायतदारांना पॅक हाऊस उभारणीसाठी जिल्हा बँकेकडून अर्थसहाय्य देणार-जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी* 

*सिधुदुर्गनगरी १३*

बागायतदारांना पॅक हाऊस उभारणीसाठी जिल्हा बँकेकडून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तरी शेतकऱ्यांनी या पॅक हाऊसचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात मा. अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. या सभेस श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग तसेच जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. या सभेमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ अंतर्गत काढणी पश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत फार्म गेट पॅक हाऊसच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांमधील बांधकाम आराखड्यामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, जिल्ह्यातील स्थानिक / भौगोलिक परिस्थितीनुसार आवश्यक असणाऱ्या बदलांबाबत चर्चा करण्यात आली. फार्म गेट पॅक हाऊसच्या मार्गदर्शक सुचनांमधील आवश्यक बदलांबाबत उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे निवेदन सादर केले. त्यानुसार सदर मार्गदर्शक सुचनांमध्ये आवश्यक बदल करणेबाबत मा. संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली. तसेच मा. अध्यक्षांनी फार्म गेट पॅक हाऊसच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये आवश्यक बदल होईपर्यंत शेतकऱ्यांच्या अर्जाना मुदतवाढ मिळणेबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविणेबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांना मा. अध्यक्षांनी सूचना दिल्या. तसेच या विषयी आपल्या स्तरावरून देखील मा. पालकमंत्री साहेबांना लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष महोदयांनी सांगितले.
सदर पॅक हाऊस उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ८०% पर्यंतचा कर्ज पुरवठा बँकेकडून केला जाईल यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या माहितीसह प्रस्ताव लवकरात लवकर बँकेच्या नजीकच्या शाखेत सादर करावेत. या संदर्भात काही माहीती आवश्यक असल्यास बँकेच्या प्रधान कार्यालयामधील नोडल ऑफिसर श्री. आनंद टेमकर मोबा. नं. ९४०३३६६२७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!