बांदा शेर्ले पुलावर अवैध दारू वाहतूक प्रकरणी चौघे ताब्यात…

बांदा शेर्ले पुलावर अवैध दारू वाहतूक प्रकरणी चौघे ताब्यात…

*कोंकण एक्सप्रेस*

*बांदा शेर्ले पुलावर अवैध दारू वाहतूक प्रकरणी चौघे ताब्यात…*

*बांदा ः प्रतिनिधी*

बांदा ते शेलें मार्गावरील पुलावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पकडण्यात बांदा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹17,59,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता बांदा-शेर्ले पुलावर ही कारवाई करण्यात आली.

अशा पोलिसांनी आरोपींकडून पांढऱ्या रंगाची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (MH 08 AG 1221) ही ₹15 लाख किंमतीची गाडी तसेच हॅवईस फाईन व्हिरकी या गोवा बनावटीच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या असलेले एकूण 60 बॉक्स अंदाजे ₹2,59,200 किमतीच्या दारूचा साठा असा एकूण ₹17,59,200 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही दारू गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या आणली जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!