*कोंकण एक्सप्रेस*
*शिक्षण क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राध्यापिका विशाखा जयश्री प्रभाकर साटम यांना ईगल फाउंडेशन 2025 चा राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार प्रदान*
*शिरगांव | संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या शिरगांव येथील स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेस च्या प्राध्यापिका विशाखा जयश्री प्रभाकर साटम हिला 9 नोव्हेंबर 2025 रोजी डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनियर कॉलेज,आष्टा, जिल्हा-सांगली येथे ईगल फाउंडेशनच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ.शंकर अदानी( चेअरमन एलिफ चेंबर्स ऑफ कॉमर्स नवी दिल्ली) डॉ.शंकर पदमश्री दादा इदाते, डॉ.अण्णासाहेब डांगे (माजी मंत्री), माजी आ.सदाभाऊ खोत, ऍड. श्री चिमणभाऊ डांगे, सुनील फुलारी(विशेष पोलीस,कोल्हापूर), संदीप घुगे(सांगली, पोलीस), मा.श्री.सोमनाथ पाटील, सौ वैशाली चव्हाण(उपायुक्त मनपा पुणे), डॉ.सुरेश राठोड, सूर्यकांत तोडकर (विश्वस्त डॉ.डी.वाय पाटील) प्रवीण काकडे, सुरेश माडकर, मा.प्रा.अरुण घोडके, विलासराव कोळेकर ( ईगल न्यूज पत्रकार) यांचे विशेष उपस्थिती होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राध्यापिका विशाखा साटम यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेस हे नुसते क्लासेस नसून आज गुणवत्ता पूर्ण शिक्षण वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थी केंद्रीय दृष्टिकोन यासाठी एक विश्वसनीय आणि प्रेरणादायी ‘शिक्षण मंदिर’ म्हणून ओळखले जाते. प्राध्यापिका विशाखा साटम गेले साडेनऊ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेस शिरगाव विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पायाभरणीचे कार्य करत असून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने समर्पणाने आणि कौशल्यपूर्ण मार्गदर्शन देण्यात येत आहे. या क्लासेसची खासियत म्हणजे “केवळ अभ्यासक्रम शिकवणे नव्हे तर विद्यार्थ्यांना ध्येय आत्मविश्वास आणि यशस्वी आयुष्याची प्रेरणा देणे शिक्षण, हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे” या तत्त्वावर आधारित हे शिक्षण केंद्र आज हजार पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे एक व्यासपीठ बनले आहे दरवर्षी वाढणारा ‘100% उज्वल यशाची परंपरेचा आलेख पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हीच स्काय एज्युकेशनची खरी ताकद आहे’ हे केवळ कोचिंग क्लासेस नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेले एक शिक्षणाचे मंदिर आहे
आजवर विविध महाविद्यालय युनिव्हर्सिटी इतर संस्था आणि व फाउंडेशन मधून त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘650 अधिक प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे, गौरवपत्रे’ या शिक्षण क्षेत्रासाठी प्राप्त झाली. आहेत. तसेच ‘एडी फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र राज्य डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आदर्श प्राध्यापिका पुरस्कार, नमस्कार फाउंडेशन,दिल्ली याच्याकडून भारत गौरव सन्मान 2025 चा आदर्श प्राध्यापिका पुरस्कार असे राज्य व केंद्रस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.’ या गुणवत्तेवर आधारित वैयक्तिक लक्ष अध्यापन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न मुळे शेकडो विद्यार्थी उच्च गुणवत्तेने उत्तीर्ण झाले असून त्यांच्या यशाचा मोलाचा वाटा असल्याने प्रामाणिक जाणीव त्यांना आहे. या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ईगल फाउंडेशनच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार 2025 त्यांच्याकडून मानाचा फेटा, सन्मानपत्र,गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तिच्या या शैक्षणिक क्षेत्रातील उतुंग कामागिरीबद्दल सर्वच स्तरातून विशेष कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

