*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा उद्योग केंद्र ,मिटकॉन सिंधुदुर्ग, ग्रामपंचायत कलमठ यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने*
*’उद्योजकता विकास प्रशिक्षण’*
*कणकवली : प्रतिनिधि*
कार्यक्रम कलमठ ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमात बेकरी उत्पादन पदार्थ प्रशिक्षण कार्यक्रम साठी प्रशिक्षणार्थी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, सदर मुलाखती जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांच्या मार्फत झाले.
सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये ३० महिलांची तुकडी केली असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र व १००० जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळणार असून जिल्हा उद्योक केंद्राच्या विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन जिल्हा उद्योग निरीक्षक कोमल माने यांनी केले. ‘ महिला स्नेही गाव संकल्प राबवताना गावातील महिला सक्षमीकरण साठी अश्या शिबिरांचे आयोजन आपण करत असून यातून महिला उद्योजीका तयार झाल्यास सरपंच म्हणून आनंद होईल त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य आपण कर असे बोलताना सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले कलमठ गावाची या उपक्रमासाठी निवड केल्या बद्दल मेस्त्री यांनी आभार मानले.एक महिन्याच्या या शिबिराला गावातील ३० महिलांची निवड झाली आहे.
यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उद्योक निरीक्षक कोमल माने, मिटकॉन जिल्हा समन्वयक जितेंद्र चिकोडी, सदस्य नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, तन्वीर शिरगावकर उपस्थित होते.

