कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…*

*कणकवली : प्रतिनिधि*

कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कणकवली तहसील कार्यालय येथे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे काम पाहत असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील काम पाहत आहेत. नगराध्यक्ष व १७ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून कणकवली शहरातून एकूण १३२७८ मतदार

मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १७ प्रभागांकरिता चार टेबल, नगराध्यक्ष पदासाठी एक टेबल तर पावती व अनामत रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र टेबल लावण्यात आले आहे. तसेच अर्ज तपासणीसाठी देखील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी शहरातून एकूण १३२७८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात ६४३३ पुरुष व ६८४५ महिलांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये ८९८ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये ७८२, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५८०, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ६७२ प्रभाग क्रमांक ५ मध्ये ७९१ प्रभाग क्रमांक ६ मध्ये ७८३ प्रभाग क्रमांक ७ मध्ये ११२३, प्रभाग क्रमांक ८ मध्ये ८२० प्रभाग क्रमांक ९ मध्ये ८६२ प्रभाग क्रमांक १० मध्ये ७४८, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ६५८ प्रभाग क्रमांक १२ मध्ये ९७५ प्रभाग क्रमांक १३ मध्ये ७८० प्रभाग क्रमांक १४ मध्ये ७०६ प्रभाग क्रमांक १५ मध्ये ५१४ प्रभाग क्रमांक १६ मध्ये ८७२ तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये ७१४ मतदार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १७ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. येत्या दोन दिवसानंतर अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

अद्याप कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जाहीर केलेले नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!