*कोकण Express*
*रेल्वेच्या धडकेत गवा रेडा ठार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या सिएसएमटी मंगलोर ट्रेनची धडक बसून गवा रेडा जागीच ठार झाला.आज पहाटे सव्वापाच च्या सुमारास वैभववाडी ते आचिर्णे दरम्यान कोकण रेल्वे ट्रॅकवर घडली. अचानक आलेला गवा रेडा रेल्वे इंजिनच्या बफरमध्ये अडकलेला गवा रेडा जागीच ठार झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी बफरमध्ये अडकलेल्या गवा रेडा घटनास्थळीच कापून बाजूला केला. त्यामुळे तब्बल दीड तास मंगलोर ट्रेन उशिराने सुटली.