*कोंकण एक्सप्रेस*
*वंचित घटकाच्या वस्त्या आणि रस्त्यांची नावात बदल सिंधुदुर्गचा आदर्श राज्यातील अन्य जिल्ह्यातही लागू होईल – पालकमंत्री नितेश राणे*
*संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार*
*सिधुदुर्गनगरी ९*
सिंधुदुर्गातील वंचीत घटकांच्या१९२ जातीवाचक वस्त्या आणि २५ रस्त्यांची नावे बदलण्याबाबत माहिती सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची सिंधुदुर्गात अंमलबजावणी सुरू झाली असून वस्त्यांच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी आता राज्य सरकार अन्य जिल्ह्यात करणार असून सिंधुदुर्गचा जनहिताचा निर्णयाची जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठीराज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे राज्याचे मत उद्योग बंदर विकास मंत्री तसा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलेसिंधुदुर्ग नगरी येथील बाळशास्त्री जांभेकरस्मारक पत्रकार भवन येथे संविधानिक हितक कारणी महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने राज्याचे मच्छोद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी दीप प्रज्वलन आणिछत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकरशाहू महाराजमहात्मा ज्योतिराव फुले यांच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळीभाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत संघटनेचे अध्यक्ष महेश परुळेकर संघटक अंकुश जाधव कार्याध्यक्ष रमाकांत जाधवजिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होतेयावेळी पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य उद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमाकांत जाधव यांनी केले यावेळी संघटनेच्या कार्याबद्दल माहिती देताना सामाजिक हित लक्षात घेऊन सर्वपक्षीय संविधानिक हितकारणीमहासंघाची रचना करण्यात आली आहे या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासात्मक कामांबरोबर जातीविषयक नावांमध्ये बदल करून मिळावा याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केली होती जिल्ह्यात जातीवाचक वस्त्या आणि रस्ते यांचे नावात बदल करावा यासाठी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या समावेत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यानुसार शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र शासन आदेश काढला असून यासाठी पालकमंत्र्यांचे व्यवसाय अजय सर्व गट यांचेही मोलाचे सहकार्यमिळाले आहे या क्रांतिकारी निर्णयाच्या बद्दल आजचा हा कृतज्ञता सत्कार आयोजित केल्याचे हे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले महायुती सरकारने ऐतिहासिक असा हा शासन आदेश काढला असून ज्यामुळे जिल्ह्यातील 192 जातिवाचक वस्त्या आणि 25 रस्त्यांची नावे बदलण्याचा हा निर्णय आहे या शासन आदेशानंतर जिल्ह्यातील या वास्त्यांची नावे बदलण्याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही तात्काळ अंमलबजावणी केली आहे राज्यात देशात अशा या निर्णयामुळे एक सिंधुदुर्ग चे नाव कोरले जाईल या अंमलबजावणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा सिंधुदुर्ग चा पायंडा राज्यात अमलात आणण्याच्या दृष्टीने एक दोन बैठकाही घेतल्या असल्याचे सांगताना सिंधुदुर्ग च्या मागासवर्गीय वस्त्यांची जातीवाचक नावे राज्यातील अन्य मंत्र्यांनीही आपल्या जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत याबाबतघरी अनेक वर्षे सातत्याने मागणी होत होती गेल्या मागील जनता दरबारामध्ये याबाबत केलेल्या मागणीचा विचार करून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या समावेत झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांची नावे महापुरुष किंवा अन्य नावाने देण्याबाबत शासन निर्णय काढावा अशी मागणी केली होती त्यानुसार सामाजिक न्यायमंत्र्यांनी तात्काळ याची अंमलबजावणी केली असून प्रत्येक वस्त्यांची नावे या शासन आदेशानुसार बदलण्यात येत आहेतआपण सर्वांनी एकत्र येऊन याबाबत केलेल्या या मागणीचा समाजाचा विकास होण्यासाठी प्रयत्न होणार आहे यासाठी प्रशासन आणि शासन आपल्या पाठीशी आहे प्रत्येक विकासात्मक कामांमध्ये मी आपल्याशी संवाद साधत असून १९१४ ते आतापर्यंत प्रत्येक गोष्टी जिल्ह्याची हित लक्षात घेऊन संवाद साधण्याचे काम केले आज पालकमंत्री म्हणून जनतेच्या हिताची कामे अतिशयमेहनतीने करत आहे प्रत्येक अधिकारी आणि समाजांशी जनतेशी संवाद साधून जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या वाड्यावर त्यांचा विकास करण्यासाठी घेतलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून आलेली निवेदनाचा विचार करून एक स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून या आराखडाच्या माध्यमातून आपले प्रश्न पाच वर्षात सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातीलडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे संविधान आणि त्यांचा इतिहास हा सर्वच समाजाला प्रेरणादायी असून असंख्य तरुणांनी याचा आदर्श घेतला पाहिजे व त्यांचे गुण आत्मसात केले तर आपला भारत महासत्तेकडे नेण्यास या महापुरुषांचे विचार अधिक प्रेरणादायी ठरतीललोकशाही प्रधान देश होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान याला श्रेय दिले पाहिजे आज प्रशासनातील अधिकारी हे संविधानाचे अधिकाराने त्यांना अधिकार प्राप्त झाले आहेत आम्ही लोकप्रतिनिधी ही त्यामुळे सत्तेवर बसण्याची संधी प्राप्त झाली आहे शासनाच्या या जातीवाचक नावात बदल करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशाची प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी केली असून वंचित घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहेअनेक जणहिताचे निर्णय या सरकारने घेतले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता हे विसरू शकणार नाही आपण सर्वांनी मतभेद विसरून काम करत राहू या असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले
संविधानिक हितवर्धक महासंघाचे अध्यक्षमहेश परुळेकर यांनी आपले विचार मांडताना आम्ही विविध पक्षातील राजकीय व्यक्ती मागासवर्गीय वंचित घटकाच्या विकासासाठी एकत्र झाला आहोत केली अनेक वर्षे १९९० पासून याबाबत सातत्याने जातीवाचक नावात बदल व्हावेत यासाठी मागणी सुरू होती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनीही योग्य डोळसपणे याबाबत अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत त्या शासन निर्णय काढला होताआज बौद्ध समाज या आरक्षणाच्या प्रणालीत लोकसंख्येत समावेश होत नसल्यामुळे विकास कामांवर त्याचा परिणाम होत आहे केंद्र आणि राज्य सरकारचे योजना मिळत नाहीत राज्य शासनाने राजकीय अनुसूची बाबत यात बदल करून मिळावेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आमचे हे प्रश्न सोडविण्यासाठी एक मागासवर्गीय समाजाचा नेता म्हणून ते आम्हाला सहकार्य करतील असेही ते म्हणाले
शेवटी उपस्थित यांचे आभार संघटक तथा माजी सभापती अंकुश जाधव यांनी मानले

