*कोकण Express*
*बांदा येथील उद्याचा आठवडा बाजार रद्द…*
*सरपंचांची माहिती; अत्यावश्यक सेवा मात्र सुरू…*
*बांदा ः प्रतिनिधी*
उद्या सोमवारी बांदा शहराचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला असून शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी आस्थापने शासनाच्या कोविड नियमावलीनुसार सुरू राहतील. शहरात परप्रांतीय विक्रेत्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याची माहिती बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिली. यासंदर्भात व्यापारी संघ, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याचे खान यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार रद्द केले आहेत. त्यामुळे दर सोमवारी भरणारा बांद्याचा आठवडा बाजार देखील रद्द करण्यात आला आहे. शासनाच्या नियमानुसार बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा देणारी मेडिकल, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यात येतील. लोकांनी दुकानात खरेदीसाठी गर्दी करू नये, तसेच आपली व इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच खान यांनी केले आहे.