*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीतील वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी*
*वारकरी दिंडीत पालकमंत्री नाम. नितेश राणेंचा सहभाग*
*कणकवली : प्रतीनिधी*
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ वा वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकारी संप्रदायातर्फे कणकवली शहरातून भव्य दिव्य काढलेली वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. कणकवलीकरांनी ‘याची डोही याचे देही ’वारकऱ्यांची दिंडी पाहिली. दिंडीत सहभागी झालेल्या वारकºयांनी विठूच्या नामाचा जयघोष करीत शहरातील वातावरण विठूमय केले. वारीत पालकमंत्री नितेश राणे हे देखील सहभागी झाले.
विठूच्या नामाचा जयघोष…टाळ-मृदंगाचा गजर…हाती भगवा झेंडा…महिला वारकºयांचा डोक्यांवर तुळशी वृंदावन…विठ्ठल व संतांच्या नामजपात तल्लीन झाले वारकरी…असे चित्र कणकवलीत रविवारी पहायाला मिळाले. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन उत्सवानिमित्ताने भव्यदिव्य वारकरी दिंडी (पालखी सोहळा) कणकवलीत पार पडला. या पालखी सोहळ्याच्यानिमित्ताने सर्व वारकरी एस.टी. वर्कशॉप येथील गणेश मंदिरात रविवारी सकाळी जमले. त्यानंतर विठूच्या नामाचा जयघोष अन् टाळ-मृदुंगाच्या गजरावर मंदिराकडून वारकºयांनी प्रस्थान केले.

या दिंडीत विणेकरी, वारकरी पताकाधारी, मृदुंगमणी, डोक्यावर तुळसी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळकरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. या वारीमध्ये पालकमंत्री नितेश राणे, कणकवली माजी नगरध्यक्ष समीर नलावडे, सिंधुदुर्ग भजन संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती सुरेश सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संजय मालंडकर, जिल्हा वारकारी संप्रदायातर्फे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, संतोष राऊळ, राजू राणे यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वारीत मंत्री नितेश राणे यांनी पालखीची भोई आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर त्यांनी टाळ वाजवून विठूरायासह संतांच्या नामाचा जयघोष केला. ‘विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलचा असा’ जयघोष वारकºयांनी केला. गणेश मंदिर येथून सकाळी निघालेल्या वारी छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठमार्गे प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात दुपारी दाखल झाली. याठिकाणी वारीची सांगता करण्यात आली.

