*2 महिन्याच्या अथक प्रयत्न नंतर यश*

*2 महिन्याच्या अथक प्रयत्न नंतर यश*

*कोंकण एक्सप्रेस*

*2 महिन्याच्या अथक प्रयत्न नंतर यश*

*16 लाख रुपये निधी जमा करून गौरांग परब वर यशस्वी शस्त्रक्रिया, नानावटी रुग्णालय मुंबई येथे पार पडली*

सावंतवाडी गावातील मास्टर गौरांग परब या एक वर्षाच्या बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक निधीची उभारणी करण्याकरता बाळाचे वडील यांनी आमच्या जिजा असोसिएशन च्या वैद्यकीय मदत कक्षाला निवेदन दिले, 16 लाख रुपये किमतीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ही नानावटी रुग्णालय या ठिकाणी करण्याच निश्चित करण्यात आले, या यकृत प्रत्यारोपणासाठी लाईव्ह डोनर म्हणजेच दाता म्हणून स्वतः गौरंग परब यांची आई यांनी यकृत दान करण्याची तयारी दाखवली आणि आर्थिक निधी उभारणी करता पुढील तयारी करण्यात आली दोन महिने अथक प्रयत्नानंतर 16 लाख रुपये इतका निधी उभा करून अनेक उपचारानंतर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली, या शस्त्रक्रियेनंतर बाळ व आईची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार हे नानावटी रुग्णालय या ठिकाणी सुरू आहेत, स्वतः बाळाच्या आईने यकृत दान करून समाजापुढे मातृत्वाचे अजून एक उदाहरण सिद्ध केले,

मत व आवाहन

गौरंग परब यांची शस्त्रक्रिया जितकी गुंतागुंतीची होती तितकेच महत्त्वाचे होते वेळेमध्ये उपचा र
गौरांग परब यांना दोन महिने च्या कालावधीमध्ये 16 लाख रुपये उभा करणे अत्यंत आव्हानात्मक होते यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांचे वैद्यकीय सहाय्यक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि त्यांच्या मदतीने आम्ही काही ट्रस्टच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री सहायता निधी मधून हा निधी एकत्रितपणे उभा करू शकलो, निधी उभारणीनंतर तातडीने गौरंग परब यांची शस्त्रक्रिया करण्यात आली, यावेळी मातृत्वाचे उदाहरण म्हणजेच गौरांची आई यांनी आपले यकृत दान करून आपल्या मुलाला नवजीवन दान दिले, सध्या अवयव प्रत्यारोपणामध्ये दात्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया अनेक रुग्ण हे अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत, त्यामुळे अवयव दान हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सर्वात श्रेष्ठ दान आहे ,

नेहा देसाई संचालक जिजा असोसिएशन ,कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!