*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर कणकवली मध्ये वंदे मातरम गीत गायन*
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 व्या वर्षपूर्ती निमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीमध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीत गायनाचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यात आला. आज प्रशालेला राष्ट्रसेवा समिती शाखा कणकवली यांनी भेट दिली असता प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या वंदे मातरम गीताचे सामूहिक गीत गायन केले. बँकिंग चंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी हे गीत लिहिले. या गीतामुळे भारतीयांमध्ये एकता आणि स्वाभिमानाची भावना जागृत होते. प्रशालेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी एका सुरात या गीताचे गायन केल्याबद्दल राष्ट्र सेवा समितीने शाळेचे कौतुक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे. कांबळे यांनी सांगितले की राष्ट्रीय गीत गाताना आपल्या मध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान व देशभक्ती वाढते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

