*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर कणकवलीचे बुद्धिबळ, कराटे, सॉफ्टबॉल या खेळांमध्ये सुयश*
क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय ओरस यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रशालेच्या तनिष्का आडेलकर हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक संपादन केला. सांगली येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय कराटे स्पर्धेत प्रशालेच्या भक्ति कांदळकर हिने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक संपादन केला. ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट बॉल स्पर्धेत प्रशालेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक संपादन केला. शिवांग सुदिन पेडणेकर याची विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. या संघामध्ये भाग्येश चव्हाण, श्रेणीक लवटे, चिन्मय कोकरे, कार्तिक तांबे, मयंक परब, श्रीपाद परब, अनिकेत करंबेळकर, मंथन बाचोळकर, साईश मुंज, स्वरूप परब हे विद्यार्थी होते. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वनवे व सुदिन पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना
शि. प्र. मं. कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, अध्यक्ष दत्तात्रय तवटे , सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू ,ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, मुख्याध्यापक
डॉ पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

