*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील e-KYC*
*कुठे आणि कसं करायचं E KYC*
● https://ladakibahin.maharashtra.gov.in
या अधिकृत सरकारी पोर्टलवर जा.
● तिथे लॉग इन पर्याय निवडा
● मुख्य पानावर तुम्हाला e-KYC करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
● तुमचा Customer ID किंवा योजनेचा अर्ज क्रमांक टाका.हा आयडी अर्ज करताना मिळालेल्या पावतीवर किंवा बँक/स्टेटमेंटवर असतो.
● तुमचा मोबाईल नंबर टाकल्यावर त्या नंबरवर OTP (वन टाइम पासवर्ड) येईल. आलेला OTP टाकून तुमची ओळख पटवा.
● आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून सबमिट करा.
माहिती बरोबर असल्यास तुमचं e-KYC पूर्ण होईल. स्क्रीनवर तुम्हाला Successfully Completed असं लिहिलेलं दिसेल.
ही संपूर्ण प्रक्रिया पुढच्या दोन महिन्या पूर्ण करणं आवश्यक आहे.
आपण पात्र असल्यास आपणांस पुढील प्रोसेस साठी दाखवेल व प्रोसेस follow करून आपली KYC पूर्ण करा
त्यासाठी आपणास आपले वडील / पती / नातेवाईक यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल
आपल्या पती / वडिलांच्या / नातेवाईकांच्या नंबर वर आधार व्हेरिफिकेशन OTP येईल तो टाकून आपली प्रोसेस पूर्ण करा
जे E KYC करणार नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांची नावं अर्जातून बाद केले जातील.
*लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी ज्यांना वडील आणि पती असे दोनीही नाही त्यांनी नातेवाईकांचा आधार क्रमांक otp व्हेरिफिकेशन करून kyc पूर्ण करू शकतात*

