*कोंकण एक्सप्रेस*
*विशाल परब, राजन तेलींना मी मानत नाही..*
*राजन तेली टेम्पररी…. परमनंट नाही ; खासदार नारायण राणे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्रहार येथील पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी विशाल परब यांच्यावरही थेट निशाणा साधला. “विशाल परबला मी किंमत देत नाही. तो कोठेही भेटला तरी भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्येही भेटला तरी मीडियाला ब्रेकिंग मिळेल. मग वाचवायला कोणीही येऊ दे,” असे म्हणत राणे यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. “विशालने भाजपावर कमी टीका केलेली नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेना युतीतून ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत विचारले असता, राणे म्हणाले, “असे झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात भाजपा शिंदे सेनेशी संबंध तोडेल.” माजी आमदार राजन तेली यांच्या पुढाकाराने ही आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र राणे यांच्या या इशाऱ्याने ही संभाव्य आघाडी सुरु होण्यापूर्वीच कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पत्रकार परिषदेला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, संचालक महेश सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.

