महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार ; खासदार नारायण राणे

महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार ; खासदार नारायण राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार ; खासदार नारायण राणे*

*कणकवली ः संजना हळदिवे*

सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाची शिवसेना आणि महायुती एकत्र येऊन लढणार असल्याचे जाहीर वक्तव्य केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्गात भाजप-शिंदे सेना आमनेसामने येणार, अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. “भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असून, महायुतीतूनच निवडणुका लढाव्यात, याच मताचा मी आहे,” असे राणे म्हणाले. येत्या दोन दिवसांत या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!