*कोकण Express*
*मालवणात काँग्रेसच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी…*
*मालवण ः प्रतिनिधी*
येथील तालुका काँग्रेसच्या वतीने आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या हस्ते फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी श्रीकृष्ण तळवडेकर, लक्ष्मीकांत परुळेकर, जेम्स फर्नांडिस, संदीप लुडबे, लुईस मेंडोसा, चंद्रशेखर डिचवलकर, उदय लुडबे, प्रथमेश करंगुटकर, संदेश कोयंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.