दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी साजरी केली दिवाळी आणि अनोख्या पद्धतीने तुळशी विवाह

दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी साजरी केली दिवाळी आणि अनोख्या पद्धतीने तुळशी विवाह

*कोंकण एक्सप्रेस*

*दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी साजरी केली दिवाळी आणि अनोख्या पद्धतीने तुळशी विवाह*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*

जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी दिवाळी आणि तुळशी विवाह मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली. दिवाळीतील प्रत्येक दिवस पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

पहिल्याच दिवशी वसुबारस साजरी करून दिवाळी सणाला सुरुवात केली. गाय व वासरू यांच्या प्रतिमेची पूजा करून आश्रमातील दीपउत्सवास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी धनतेरसला धनवन तेरेची आजी आजोबांनी पूजा करून आपल्या निरोगीमय आयुष्यासाठी प्रार्थना व पूजा केली. लाह्या व बात्ताशीचा प्रसाद वाटून धनतेरस हा सन साजरा केला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे नरक चथुर्दशीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने अंघोळ घातली. तर नरकासुराचे प्रतीक म्हणून कारटे फोडून दिनदिन दिवाळी म्हणत दिवाळी साजरी केली. आश्रमातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारचे पोहे (गूळपोहे, कांदेपोहे, दहिपोहे, दूध पोहे आणी नारळाच्या रसातील रस पोहे )असे विविध पोहे व दिवाळीचा फराळ दिला. फराळाचा आनंद घेत फराळाचा आस्वाद या आजी आजोबांनी घेतला.

त्यानंतर सायंकाळी लक्ष्मी पूजन थाटामाटात करून फाटक्यांच्या धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. नंतर शेवटच्या दिवशी आश्रमातील आजींनी आश्रमातील आजोबांना सोबत भाऊबीजेचा कार्यक्रम करून धूमधडाक्यात भाऊबीज साजरी केली. थरथरत्या हातातील आपल्या भावाला ओवाळताना आजी आजोबांचे डोळे पाणावले होते. प्रत्येक आजोबांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी छोटीशी भेट दिली. आश्रम व्यवस्थापकांनी आजी आजोबांसाठी विशेष खाऊ देऊन त्यांना दिवाळीची छोटीशी मेजवानी दिली. अशा प्रकारे चार दिवस दिवाळी साजरी केली गेली.

दिविजा वृद्धाश्रमात दिवाळी नंतर कार्तिकी एकादशीला तुळशी विवाहाचा कार्यक्रम दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला जातो. हा सोहळा आजी आजोबांना लग्न सोहळा उपभोगता यावा या उद्देशाने साजरा केला जातो. आश्रमातील अविवाहित आजोबांचे तुळशी सोबत थाटामाटात लग्न केले जाते. आजोबांचे सर्वप्रथम केळवण करून त्यानंतर तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम आश्रमातील आजी व महिला कर्मचारी यांनी केला. तसेच आश्रमातील कर्मचारी सौ प्रतीक्षा सावंत यांनी ओव्याच्या तालावर तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम पार पाडला. तांदूळ निवडून झाल्यावर आश्रमातील आजींनी व कर्मचाऱ्यांनी मेहंदीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. त्यानंतर लग्न विधींना सुरुवात झाली. त्यात नवऱ्याला हळद लावली. त्यानंतर नाच गाण्यांच्या तालावर हळदीचा कार्यक्रम साजरा केला.

या आश्रमातील दोन्ही पायांनी अपंग असलेले विवेक करकरे आजोबांना लग्नाच्या बोहल्यावर चढवण्यात आले. आपल्या अपंगत्वामुळे आपले आयुष्य कधीच लग्न होऊ शकत नाही अशी खंत करकरे आजोबांना होती. ती इच्छा आश्रमचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी तुळशी सोबत लग्न लावून त्यांची इच्छा पूर्ण केली. लग्न सोहळ्यात आश्रमातील कर्मचारी श्रीम भारती गुरव यांनी आपल्या सुस्वर आवाजात मंगलाष्टके गाऊन आश्रम परिसर गजबजून टाकला होता. सर्व आजी-आजोबांनी खऱ्या- खुऱ्या लग्न सोहळ्याचा आनंद आज लुटला होता. अशा प्रकारे वसुबारस पासून ते तुळशीविवाह पर्यंत दिवाळी उत्सव दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!